Tuesday, 14 May 2019

नमस्कार श्री सिध्दनाथ क्षेत्र खरसुंडी देवाची संपुर्ण माहिती तसेच खरसुंडी मध्ये होणारे संपुर्ण उत्सवा(कार्यक्रमाची माहिती)ची माहिती मिलेल

सांगली जिल्हयातील आटपाडी तालुक्यात बसलेले श्री क्षेत्र( खरसुंडी )हे गाव महाराष्ट्र सह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील असंख्य भाविकांचे कुल दैवत आणि श्रद्धा स्थान आहे.

(कालभैरव) श्री सिध्दनाथाचे इथे भव्य आणि आकर्षक मंदिर आहे.
मंदिराला अंदाजे ११०० वर्षांपूर्वीचा इतिहास आहे.

विजापूर गुहागर राज्य महामार्गावर भिवघाट पासून उत्तरेला अंदाजे१० ते१३ किलोमीटर अंतरावर हे तीर्थ क्षेत्र वसलेले असून पुराणिक ग्रंथामध्ये या मंदिराचा उल्लेख केलेला आहे

या मंदिराविषयी एक आख्यायिका सांगितली जाते.
प्रचंडासुर नावाचा असुरी वृत्तीचा राजा राज्य करत होता.

तो आपल्या दुष्क्रुत्याने सर्वाना छळत असे. ब्रह्म देवाकडून अजिंक्य राहण्याचे वर प्राप्त केलेला होता.
या वराचा दूरउपयोग करून तो देवासह सर्वाना त्रास देत होता.
त्याचा त्रासाला भय भीत होऊन लोक ब्रह्म देव शिव आणि शंकराकडे गेले तेव्हा भगवान शंकराने आपल्या तिसऱ्या नेत्रातून भैरववास जन्म दिला. सर्व देव देवतांनी आपली दिव्य अस्त्रे भैरववाला दिली.
भैरव सूर सैन्याचा सेनापती बनून पृथ्वीवरती आला आणि त्याने प्रचण्डासुराचा वध केला आणि तो तिथे राज्य करू लागला.
त्यामुळे पुन्हा लोक समाधानाने राहू लागले काहीकाळा नंतर भैरवनाथ आणि योगायी यांचा विवाह झाला ते सुवर्णपुरीत राहू लागले. नयाबा या भक्ताच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भैरवनाथाने नयाबाला त्याचा गायीचा खरवासातून प्रकट होणार असल्याचे द्रुष्टांत दिला.
 नायबाची गाय कपिली तिचा खरवासातून दोन पिंडींचा आकार प्राप्त झाला आणि त्यातून कालभैरव प्रकट झाले
तेव्हा पासून हे क्षेत्र खरवसपिंडी म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याचा अपभ्रंश होऊन या क्षेत्रास खरसुंडी हे नाव पडले.

श्री सिध्दनाथांचे खरसुंडीत दक्षिणाभिमुख हेमाड पंथी मंदिर आहे
समोरील मुख्य प्रवेश द्वार भव्य आवर, दर्शन मंडप,  नगार खाना, सभामंडप गाभारा आणि नाथ योगेश्वरीची मुर्ती गर्भ गृह आहे. त्यावर आकर्षित बांधकाम केले आहे. मंदिरातील गर्भग्रहामध्ये चांदीचा मखरामध्ये श्री सिध्दनाथ आणि योगेश्वरी देवीची उभी मूर्ती आहे. मूर्तीवर शेषनागाचे छत्र असून समोर स्वयंभू शिवलिंग आहे.
गाभार्याच्या बाहेर येताच प्रचंड भव्य सभामंडप आहे.

मंदिराचा मुख्य गाभार्या भवती सुमारे १५० फूट उंचीचे भव्य शिखर आहे
संपूर्णपणे संगम वराचा वापर असल्याने शिखराला वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे
मंदिराचा आवारात दीपस्तंभ (दीपमाला) देखील उभारण्यात आलेले आहेत.
श्री क्षेत्र सिध्दनाथ हे एक जागृत देवस्थान असल्यामुळे भाविकांची या देवस्थानावर अपार श्रद्धा आहे.

विवाह झालेल्या ज्या जोडप्याना मुल होत नाही ती जोडपी या ठिकाणी मलाईदेवीला मुल होण्यासाठी नवस बोलतात, व मुल झाल्या वर नवस फेडतात


नवीन लग्ने झालेल्या जोडपेयेथे  येऊन देवाचा आशिर्वाद घेण्याची प्रथा इथे वर्षानु वर्षे चालत आली आहे


"काशीविश्वनाथ "या नावाने देवाला संबोधले जाते  कालभैरव हा प्रथम सोनारी, म्हसवड वरून खरसुंडी येथे नयाबा च्या भक्ति ला प्रसन्न होवुन आलेत
दर सोमवारी  देवाची गोसावी पद्धतीने पुजा असते
मंगळवारी खडीपूजा असते
बुधवारी हत्तीवर पूजा असते
गुरुवारी सिंहावर
शुक्रवारी नागावर
शनिवारी घोड्यावर
रविवारी देवाची गादीवर बैठी स्वरूपात पुजा असते
Siddhanath is believed to be incarnation of Lord Shiva. Siddhanath is the patron god of Atpadi and adjacent regions and one of among several  god of Maharashtra. Historical temple of lord Siddhnath,a big temple built in 150 years ago. The God in this temple is reincarnation of Lord Shiva This God had two wives one stays with him (Goddess Jogeshwari) and other wife that is goddess Zakabai who is staying 5 km away from kharsundi near from Neilkarnji. God Nathbaba can meet her once in 3 years and this condition was put by his first wife Goddess Jogeswari. So all the villagers go along with Palki of god to meet her some where in December. Near Kharsundi there is a place called Gohdakur where the natural spring of water is coming from ages and does not go dry, the story is that God Nathbabas Horse once saw and jumped and put its feet on ground, the water started flowing there, the snake was there for restrict god from meeting his second wife.
 काही माहिती हवी असल्यास तुम्हास मिलेल तसेच मी ब्लॉग वर पोस्ट करेन
  EMIL ID- guravsushant058@gmail.com
तसेच मित्रांनो सबस्कायब करा यु ट्यूब चायनल  "kharsundi nagari" आणि बेल आयकान बटन दाबा नविन व्हिडीओ पाहण्यासाठी